Posts

पेंशन गिफ्ट!

असं म्हणतात एखादी चांगली गोष्ट झाली की गोड आणायचं व देवापुढे ठेवायचं मग अगदी नुसती साखर ठेवली तरी चालेल. तशीच एक माझी आठवण माझ्या आजी बद्दलची. माझी आजी गव्हर्मेंट मध्ये शिक्षिका होती मराठी, इतिहास, हिंदी इ. विषय पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवायची. निवृत्ती मिळाल्यानंतर तिला दर महिना पेन्शन मिळत असे आणि पेन्शन म्हणजे आमच्या घरात आनंद असायचा. "काय मग मज्जा आहे बाबा एक मुलीची,पेंशन मिळणार आहे कोणाला तरी!"असं म्हंणून आम्ही तिला खूप चिडवायचो आणि ती सुद्धा मनापासून चिडवून घ्यायची.मुळात तो दिवस तिला 'पैसे' मिळतील यापेक्षा एका वेगळ्याच 'गोड' कारणामुळे आवडायचा. ते गोड कारण म्हणजे 'काजूकतली'! मी आणि आजी त्याची अगदी आतुरतेने वाट पहायचो.आणलेली काजुकतली तासाभरात संपूनही जायची. तो दिवस कधी येईल  असं व्हायचं बिचारीला. डायबिटीस असल्यामुळे एरवी गोड खाता यायचं नाही.पण  पेंशन च्या दिवशी मात्र काजूकतलीचा मनमुराद आस्वाद घ्यायची आणि पुढे ही प्रथाच पडली.आता या गोष्टीत खंड पडला कारण दोन वर्षांपूर्वी माझी आजी गेली पण मी ठरवलं आहे जेव्हा मला पगार मिळत जाईल तेव्हा मी पण